राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले आहे की, 80 वर्षांचे होऊनही काही लोकांना अद्याप निवृत्त व्हायचे नाही.वयाची 80 वर्षे असूनही काही लोकांचा राजकारणाचा भ्रमनिरास होत नाही. असे लोक निवृत्त व्हायला तयार नसतात.असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला.
या वर स्वतः शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना भाष्य केले. ते म्हणाले काय बोलावं आणि कसं बोलावं हा ज्याच्या त्याच्या प्रश्न आहे. मी त्यावर काहीही बोलणार नाही. ज्यांना कोणाला एखाद्याचे वय काढायचे असेल तर ते काढू शकतात. माझ्या बद्दल बोलायचे म्हटले तर मी 1967 साली संसदीय राजकारणात आलो.तेव्हा पासून राजकारणातून एकदाही ब्रेक घेतले नाही. माझ्या कामाबद्दल कोणी विरोधी हा बोलत नाही.