सोमवारी उत्तर इंग्लंडच्या किनाऱ्याजवळील उत्तर समुद्रात एक तेल टँकर आणि एक मालवाहू जहाज यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला. ब्रिटनच्या ग्रिम्स्बी ईस्ट बंदराच्या प्रमुखांनी सांगितले की, मृतांची संख्या वाढू शकते. ब्रिटिश आपत्कालीन सेवेनुसार, अपघातानंतर दोन्ही जहाजांना आग लागली. मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ब्रिटनच्या मेरीटाईम अँड कोस्टगार्ड एजन्सीने सांगितले की, उत्तर समुद्रातील घटनास्थळी अनेक लाईफबोट्स, एक कोस्टगार्ड रेस्क्यू हेलिकॉप्टर, एक कोस्टगार्ड विमान आणि अग्निशमन क्षमता असलेली जवळपासची जहाजे पाठवण्यात आली आहेत .
अपघातग्रस्त जहाज अमेरिकेचा ध्वजांकित रासायनिक आणि तेल उत्पादन वाहक एमव्ही स्टेना इमॅक्युलेट आहे, जे घटनेच्या वेळी नांगरलेले होते. मालवाहू जहाजाची ओळख 'सोलॉन्ग' अशी झाली आहे, जे स्कॉटलंडमधील ग्रॅंजमाउथ येथून नेदरलँड्समधील रॉटरडॅमला जात होते.ही धडक लंडनच्या उत्तरेस सुमारे 250 किमी अंतरावर हल किनाऱ्याजवळ झाली.