सापाचं नाव जरी ऐकले तर अंगाचा थरकाप होतो. आणि साप जर प्रत्यक्षात समोर आला तर विचार करून देखील अंगाला काटा येतो. सापाच्या दंशाने अनेकांचा मृत्यू दररोज होतो. गावात शेतातून साप सहजपणे घरात शिरतात. सापाचा घरात शिरून बाळाच्या झोपाळ्याला विळखा घालण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डॉ. प्रशांत भामरे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे.
या व्हिडिओमध्ये शेताच्या बाजूला घर आहे. या घरात झोपाळ्यात बाळ झोपले आहे. अचानक पणे एक साप येतो. आणि पाहता- पाहता झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्याच्या दोरीवर चढतो. आणि बाळाला विळखा घालत आहे.