अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Webdunia
शनिवार, 17 डिसेंबर 2022 (15:30 IST)
अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी अकोला शहरातील न्यू तापडिया भागात घडली. या अल्पवयीन मुलींची वये 14 वर्ष आणि 16 वर्ष आहे. या मुलींवर शुक्रवारी रात्री 9  वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. सदर घटना मुलींनी आपल्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध घेत काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या मुलींवर दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे शहर हादरले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख