शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय मुंबईत नव्हे तर ठाण्यात

Webdunia
रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:01 IST)
शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यात राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाण्यात टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यलय हेच शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय असणार आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईतील पहिले विभागप्रमुख म्हणून यशवंत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्त जाहीर करताना शिंदे गटाने जे पत्र प्रसिद्ध केलंय त्यात त्यांचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे टेंभी नाका येथील आनंद आश्रम असा पत्ता लिहिण्यात आलाय.
 
'आनंद आश्रम' म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यालय. आनंद दिघे यांचा निवासस्थान आणि कार्यालय हेच आता शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून दाखवण्यास येत आहे.
 
शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना उभारणार असल्याची माहिती समोर आली होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांसोबत संपर्क राहण्यासाठी प्रत्येक प्रभागात शिंदे गट कार्यालया उभं करणार असल्याची माहिती समोर आली होती.
 

संबंधित माहिती

पुढील लेख