रोहित पवारांच्या अडचणीत वाढ,ग्रीन एकरच्या चौकशीला ईडीकडून सुरुवात

शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (21:10 IST)
राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाली आहे.
 
ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये २००६ ते २०१२ पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते. त्यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील २००६ ते २००९ पर्यंत या कंपनीचे संचालक होते. त्याचबरोबर या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात असलेल्या एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत आणि याचदृष्टीनं ईडीचा तपास सुरु झाला आहे.
यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. याचबरोबर ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून बाहेर पडले त्यानंतर हळूहळू इतर चार सदस्य देखील त्या कंपनीमधून बाहेर पडले. त्यामुळें आता ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहीत पवार यांचे राखेश वाधवान यांच्या सोबतचे संबंध पाहता प्राथमिक तपासला सुरुवात आहे. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याचा बारकाईने तपास केला जाणार आहे. ईडीला यामध्ये मनी लॉन्डरिंग तर झालं नाही ना याचा तपास करायचा आहे.
 
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राजकीय सूडापोटी रोहित पवार यांचे नाव अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासे यांनी सांगितले आहे की, ईडीचा वापर हा राजकीय विरोधाकांसाठी केला जात आहे. कारण नसताना रोहित पवारांचे नाव घेण्यात आल्या आहेत. ग्रीन एकर कंपनीचे संचालक देखील नाहीत. महागाई, बेरोजगारीवर भाजपच्या विरोधात महाविकासआघाडीचे जे नेते बोलत आहे त्यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती