गौतमभाईंना बारामती नवी नाही - सुप्रिया सुळे

शुक्रवार, 17 जून 2022 (10:14 IST)
जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेले गौतम अदानी यांनी बारामतीचा पाहुणचार घेतला. शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी हजेरी लावली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं.
 
गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत. अदानी दरवर्षी दिवाळीला बारामतीत येतात. आज तिथीनुसार दिवाळी नसली तरी सायन्स सेंटरचं उद्घाटन हा दिवाळीचा योग आहे आणि अशावेळेस गौतम अदानी उपस्थित आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती