sambhaji nagar : दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2023 (13:21 IST)
Sambhaji nagar Accident : अहमदनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर वसाहतीत महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी रात्री 10:50 च्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला असून दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले तर दोघे जण ठार झाले. अपघातग्रस्तांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील संजय रामदास बोरुडे आणि त्यांचा मित्र कल्याण प्रभाकर मानकापे दुचाकीवरून येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या हिरो होंडा या दुचाकीशी जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात संजय बोरुडे हे ठार झाले आहे. तर कल्याण मानकापे यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास करत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख