मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार रविंद्र फाटकही आता गुवाहाटीला पोहोचले आहेत. ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीयही आता एकनाथ शिंदेबरोबर जात आहेत. शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या आता ४१ वर गेली आहे. त्याचबरोबर मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड हे पण गुवाहाटीत आहेत. आमदार रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनीही बंडखोर आमदारांना साथ दिल्याने ठाकरे कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे.