मात्र, रेशनच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे शिधापत्रिका नसेल तर तुम्ही कमी किमतीत मिळणाऱ्या रेशनच्या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. शिधापत्रिका वापरून तुम्ही केवळ रेशनच नाही तर इतर अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. राजस्थान सरकार शिधापत्रिकाधारकांना केवळ 450 रुपये किमतीत एलपीजी गॅस सिलिंडर देत आहे.
उज्ज्वला योजनेत आतापर्यंत गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळत होता. मात्र, आता राजस्थानमधील ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.