Maharashtra Rains : मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:02 IST)
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भ या भागांना अधिक फटका बसला आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली. तेव्हापासून राज्यात पाऊस गायब झाला. मात्र, पुन्हा मान्सुन बरसणार असल्याच हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Rains) आगामी दोन दिवसामध्ये ढंगाच्या गडगडाटांसह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली (IMD) आहे.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस (Rain) पडेल. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आज (शनिवार) पहाटे हवेचं किंचित गारवा होता तर मुंबई अजूनही दमट व गरम वातावरण आहे. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख