अरे बाप रे ! पत्नीने मोबाईल साठी पतीचे ओठ विळ्याने कापले,मसाला मधील धक्कादायक घटना

शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (15:26 IST)
अति सर्वत्र वर्जयेत, असं म्हणतात की कोणत्या गोष्टीची अति करू नये. अति केल्याचा परिणाम नेहमी वाईटच असतो. सध्या मोबाईलचे वेड लहानांपासून वृद्धांपर्यंत लागला आहे. मोबाईल पायी लोकांनी आपला जीव गमावला आहे. आणि जीव घेतला आहे. अशी एक धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील मासाळ येथे घडली आहे.इथे एका पत्नीने आपल्या पतीला तिचा मोबाईल फोन परत देण्यास सांगितले.पती ने नकार दिल्यावर पत्नीने रागाच्या भरात येऊन विळ्याने त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात पतीचे ओठ कापले गेले.
 
प्रकरण असे आहे की ,मासाळ येथील खेमराज बाबुराव मूल(40) यांच्या मोबाईल
बिघडल्या मुळे पत्नीचा मोबाईल वापरायला घेतला. मात्र पतीने मोबाईल परत दिला नाही त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि ते विकोपाला गेले असता पत्नीने रागाच्या भरात येऊन पतीवर विळा फेकून मारला.या हल्लयात पती सुदैवाने वाचला पण विळा त्याच्या ओठावर लागल्यामुळे त्याचे ओठ कापले गेले. खेमराज यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे. 
    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती