महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : एकनाथ शिंदेंशी चर्चेनंतर बोम्मईंची नरमाईची भूमिका

Webdunia
बुधवार, 7 डिसेंबर 2022 (07:44 IST)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत असतानाच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागात कायदा व सुव्यवस्था राखण्याला प्रथम प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
दरम्यान, आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादासंदर्भातील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगायला मुख्यमंत्री बोम्मई विसरले नाहीत.
 
 
“मात्र, सीमाभागाचा विचार केल्यास त्याबाबत आमची भूमिका बदललेली नाही. सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई आमच्या बाजूने सुरूच राहील,” असं बोम्मई यांनी म्हटलं.
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

पुढील लेख