नवी मुंबईत कोपरखैरणे येथे सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारात महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आरती विजेंद्र मल्होत्रा असे या मयत महिलेचे नाव आहे. तर महिलेचा मुलगा अरविक हा गंभीर जखमी झाला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजले आहे. या प्रकरणी आरतीच्या सासरच्या मंडळी सासू, सासरे, नणंद आणि पतीच्या विरोधात तिचा छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.