सोमय्या यांनी नांगरे पाटील यांच्या वर आरोप केला आहे की,त्यांनी आपल्या पोलीस अधिकाराचा वापर काही भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला आहे.सोमय्यांनी नांगरे पाटील यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे.त्यांनी म्हटले की मी कोल्हापूरला जात असताना मला मुंबईत रोखले गेले आणि मला सहा तास घरात कोंडून ठेवले.
या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणाले की ,किरीट सोमय्यांनी केलेली तक्रार अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही कदाचित इतर सदस्यांकडे गेलेली असावी.या संदर्भातील राज्यसरकारशी विचारणा करून त्याचे अहवाल मागवून हे प्रकरण आयोग हाताळेल.असे त्यांनी सान्गितले.