शिवसेनेत मोठी खळबळ :देवेंद्र फडणवीस

रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर शिवसेनेत खळबळ उडाली आहे.अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.रामदास कदम यांची ती क्लिप खरी आहे की खोटी हे मला माहिती नाही.पण या मुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. 
फडणवीस सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नांदेडमध्ये गेले आहे तिथे त्यांनी माध्यमांशी बोलत असताना रामदास कदम यांच्या त्या ऑडिओक्लिप वर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर सध्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात काही खदखदत आहे. मी त्याच्यावर काहीच कॉमेंट देणार नाही. या प्रकरणात जी कारवाई करावयाची असेल ती त्यांच्या पक्षाचा नेता करेल. असं फडवणीस यांनी वक्तव्य केले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती