मिळालेल्या माहितीनुसार सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेम आणि बदनामीला कंटाळून १७ वर्षांच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी दोघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.