त्यांना रुग्णालयात नेले असता त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पतीलाही किरकोळ दुखापत झाली असून मुलुंड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 281 (निष्काळजीपणे वाहन चालवणे), 106 (मृत्यूस कारणीभूत) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अपघात झाल्यास चालकाचे कर्तव्य) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाला लगेच अटक करण्यात येईल असे सांगितले जात आहे.