पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी करा- अतुल भातखळकर

Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:01 IST)
पत्राचाळ प्रकरण आता अधिकच गूढ होत चालले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. 
<

शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर... pic.twitter.com/cLJzIgEpr2

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2022 >
याबद्दल लिहिण्यात आलेले पत्र भातखळकर यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केले आहे. मराठी माणसाला बेदखल करण्यासाठी या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा काय संबंध होता याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत व्हावी असं त्यांनी यात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत जवळपास दोन महिन्यांपासून अटकेत आहेत.
 
19 सप्टेंबर रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख