वैयक्तिक कामांसाठी चार्टर्ड विमानाचा वापर नाही, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे प्रतिज्ञापत्र

बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (08:39 IST)
कोविड-१९ (Covid19) च्या काळात कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला होता. अशी माहिती राज्याचे माजी उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली.
 
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडॉनच्या काळात चार्टर्ड विमानातून प्रवास करून राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीर वापरले आहेत. राऊत यांनी जून ते सप्टेंबर 2020 काळात मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली दरम्यान अनेकदा चार्टर्ड विमानातून केलेला प्रवास प्रशासकीय कामाचे कारण देत कर्जबाजारी असलेल्या वीज कंपन्यांना 40 लाख रु. बिल भरण्यास भाग पाडले.असा आरोप करून मंत्र्यांकडून प्रवासासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
 
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राऊत यांनी नागपूरला प्रवास करण्यासाठी 12 वेळा चार्टर्ड विमानातून प्रवास केला आणि त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा दावा याचिकाकर्त्यांने केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती