पती- दिराने पाच महिन्यांच्या गर्भवतीस पेटवले

सोमवार, 26 मार्च 2018 (15:58 IST)

धक्कादायक घटना नाशिक जिल्हात घडली आहे. या मध्ये सटाणा तालुक्यातील पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने  गर्भपात करण्यास नकार दिल्याने पती, दीर, सासरा यांनी तिला पेट्रोल टाकून पेटवून देऊन  ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

तर याबरोबर विवाहितेवर अनेकदा शारीरिक,मानसिक अत्याचार या सर्वांनी केले आहे. या प्रकरणातील पीडित विवाहिता रुपाली विलास कुमावत (रा.अंबिकानगर, सटाणा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पती विलास दशरथ कुमावत, दीर योगेश दशरथ कुमावत, सासरा दशरथ गंगाधर कुमावत यातिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी कोणासही अटक केली नाही.

 
दीर असलेल्या योगेशने पीडित महिलेवर पेट्रोल ओतले होते. तर पती विलास याने जळती काडी लावली होती पीडित रुपाली 55 टक्के भाजली आहे. रुपाली यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे महिला घरातही सुरक्षित नाहीत हे समोर आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती