हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड

Webdunia
शनिवार, 11 मार्च 2023 (12:53 IST)
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला आहे. कागल येथील घरावर ईडीने पुन्हा छापा टाकला आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरात चार ते पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांतील ईडीची ही तिसरी कारवाई आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरात ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. 
 
दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे फेरऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, ईडीचे पथक पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरात दाखल झाले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर प्रकरण, आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना ब्रिक्स कंपनी चालवत होती. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. या संदर्भात ईडीने यापूर्वी तपास केला होता. आता ईडीकडून खटला सुरू झाला आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख