महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.
या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जात आधार क्रमांक भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी आधार कार्ड सादर करायचे आहे. आधार कार्ड नसल्यास या वर्षी विद्यार्थ्यांना निकाल देणार नाही असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.