Motorola ने Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला. हा फोन 2004 मध्ये कंपनीचा लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन आहे. फोनच्या प्री-बुकिंगला 16 मार्चपासून सुरूवात झाली असून 2 एप्रिलपासून विक्री सुरू होईल.
फ्लिपकार्ट तसेच निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे. मोटोरोलाने या हँडसेटसाठी फ्लिपकार्ट, सिटी बँक आणि जिओसोबत भागीदारी केलीये.
तर जाणून घ्या काय फायदे आहेत ते-
Motorola Razr सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10,000 रुपये कॅशबॅक ऑफर आहे. शिवाय 24 महिन्यांसाठी ‘नो कॉस्ट ईएमआय’ची ऑफरही आहे.
जिओच्या 4,999 रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा अँड डबल व्हॅलिडिटी ऑफर मिळेल. अर्थात एकूण 1.4 टीबी डेटा आणि 2 वर्षे वैधतेचा लाभ युजर्सना घेता येईल.
याशिवाय कंपनीकडून एका वर्षासाठी आकर्षक डिस्काउंटसह मोटोकेअर अॅक्सिडेंट डॅमेज प्रोटेक्शन प्लॅनही ऑफर करत आहे. फोन खरेदी केल्याच्या 30 दिवसांमध्ये हा प्लॅन खरेदी करता येईल.