बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (13:02 IST)
हिंदू पंचागानुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून त्यांची जयंती या शुभ तिथीला साजरी केली जाते. दत्तात्रेय प्रभू ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे अवतार मानले जातात. दत्त संप्रदायातील लोकांसाठी दत्त जयंतीचे तसेच दत्त प्रभूंच्या नावाचे विशेष महत्त्व आहे. आपण देखील आपल्या बाळासाठी भगवान दत्तात्रेयांच्या नावावरुन नाव निवडू शकता. असे केल्याने दत्त प्रभूंचा आशिर्वाद आणि कृपा कायम राहील.