पुढील आठवड्यात चार दिवस बंद राहतील बँका, लवकर आटपून घ्या आपली कामे

मंगळवार, 17 मार्च 2020 (16:19 IST)
27 मार्च रोजी बँकिंग सेक्टरच्या दोन मोठ्या युनियन, ऑल इंडिया बँक इम्प्लॉइज एसोसिएशन (AIBEA) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स एसोसिएशन (AIBOA) ने संप पुकारला आहे. 
 
पुढील आठवड्यात बँक संप आणि बँकेच्या इतर ।सुट्ट्यांमुळे बँकिंग शाखा केवळ तीन दिवसांसाठी सुरू राहतील. बँक मर्जर विरुद्ध संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच केंद्र सरकाराने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांना मिळवून चार करण्याच्या निर्णयावर अंतिम शिक्का लगावला होता. हा निर्णय पुढील एक एप्रिलपासून लागू होणार. 
 
पुढील आठवड्यात या दिवसांवर बँका बंद राहतील- 
सोमवार आणि मंगळवारी बँका सुरू राहतील.
बुधवार म्हणजे 25 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगू नव वर्ष आणि उगादि सण असल्याने बेलापुर, बंगलूरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि पणजी मध्ये बँका बंद राहतील.
दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा बँक सुरू राहील.
शुक्रवारी म्हणजे 27 मार्च 2020 रोजी बँकेच्या संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित राहील.
28 मार्च 2020 रोजी महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 मार्च रोजी रविवार आहे. म्हणून या दिवशी देशाच्या सर्व राज्यातील बँकांची सुट्टी राहील.
 
उल्लेखनीय आहे की मागील वर्षी ऑगस्टमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे चार बँकांमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. युनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचा विलय पंजाब नॅशनल बँकेत होणार आहे. या व्यतिरिक्त सिंडिकेट बँकेचं केनरा बँक आणि अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेंसह विलय होणार आहे. या प्रकारेच आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँक ऑफ इंडिया सह विलय होणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती