पुणे : दुकाने 3 दिवस बंद

मंगळवार, 17 मार्च 2020 (09:46 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून व्यापारी महासंघाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारपेठेतली मेडिकल, किराणा जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत.  
 
पुण्यातील कोरोना व्हायरसचा फैलाव हा दुसऱ्या टप्प्यावर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. पण यात संचार बंदी नसेल अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. तसंच ज्या खासगी कंपन्यांना शक्य आहे त्या कंपन्यांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे, आदेश देण्यात आले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती