विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, डोंबिवली परिसरातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय आरोपीने या वर्षी जून दरम्यान मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. यापेक्षा अधिक काही सांगितले नाही.
ठाण्यात आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.42वर्षीय आरोपी हा डोंबिवली परिसरातील रहिवासी आहे. त्याने अनेकवेळा आपल्या मुलीवर बलात्कार केला. यावर्षी जूनपासून मुलगी एकटी असताना तो हा गुन्हा करायचा. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.