आज याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली आहे. . यावेळी जग प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. जवळपास २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.