शासकीय वसतिगृह मध्ये दाखल्यासाठी अर्ज कसे करावे
सोमवार, 16 मार्च 2020 (18:24 IST)
समाज कल्याण वसतिगृह 3 स्तरांवर चालविण्यात येते.
1 जिल्हा वसतिगृह
2 तालुका वसतिगृह
3 विभागीय वसतिगृह
समाज कल्याण शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता...
1 आवेदक महाराष्ट्रातील विध्यार्थी असावा.
2 चालू शैक्षणिकते साठी पात्र असावा.
3 ज्या कोर्सच्या प्रवेशासाठी अर्ज करीत आहे त्या कोर्सचे हे प्रथम वर्ष असायला हवे.
निवड, कोर्स, पात्रता कशी ठरते..?
मेरिट लिस्ट वर निवड होते.
अर्जासाठी फॉर्म कुठे,कधी मिळेल व फॉर्म कसा भरावा.?
10 वी आणि 12वी च्या निकाला नंतर अर्ज करावे. पेपरात जाहिराती बघणे किंवा जिल्हा समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन चौकशी करणे.
अर्जाचा फॉर्म ऑनलाईन/ ऑफलाईन कसे भरावे..?
अर्जाचा फॉर्म ऑफलाईन भरावा.
कागद-पत्र काय लागणार..?
10 वी किंवा 12 वी ची मार्कलिस्ट ची प्रत सोबत, फोटो, जातीचा दाखला, घेऊन जाणे.
आरक्षण प्रक्रिया-
SC -13 %
ST- 7 %
OBC -19 %
SBC - 2 %
भटक्या जमाती- 3 %
भटक्या जमाती व वर्ग 2.5 %
NTC - 3.5 %
NTD - 2 %
SEBC -16 %
EWS - 10 %
SC - 30 %
शासकीय वसतिगृहा मार्फत दिल्या जाणाऱ्या विध्यार्थ्यांसाठीच्या सुविधा
विद्यार्थींना शासनातर्फे राहण्याची, खाण्याची सुविधा - 4500 रुपये दिले जाते.
खर्चासाठी विद्यार्थीला Stipend (वृत्तिका)- 800 रुपये दिले जाते.
जिल्ह्यांस्तरावर
विद्यार्थींना राहण्याची खाण्यासाठी व्यवस्था - 4500 रुपये दिले जाते.
खर्चासाठी विद्यर्थिना स्टेशनरी साठी- 4500 दिले जाते, युनिफॉर्म साठी 2000 रुपये दिले जाते.
Stipend (वृत्तिका)- 800 रुपये दिले जाते.
तालुका स्तरीय
विद्यार्थींना राहण्याची खाण्यासाठी व्यवस्था - 4500 रुपये दिले जाते.
stipend (वृत्तिका)- 700 रुपये दिले जाते.