भुजबळांकडून शाळेचे उद्‌घाटन

सोमवार, 16 मार्च 2020 (13:18 IST)
महाराष्ट्रात सरकारने राज्यात गर्दी टाळण्याचे आवाहन करत अनेक ठिकाणी जमावबंदी घोषित केली आहे. कोरोना व्हारसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे तसेच सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, याच आदेशाला पुण्‍यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजेरी लावत राज्याचे अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आदेशाचे पालन न करता शाळेचे उद्‌घाटन केले.
 
यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. आता संबंधित मंत्री आणि संस्थाचालक यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, ससाणे एज्युकेशन सोसाटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन दोनवेळा ठरले होते. मात्र काही कारणास्तव प्रत्येकवेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला. आणि हा कार्यक्रम देखील फार पूर्वीच नियोजित केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती