राज्यामधील करोनाग्रस्तांची आणि करोनाचा संसंर्ग होऊ नये यासंदर्भात सरकार घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयांची सविस्तर माहिती दिली. तसेच पुढील दोन आठवडे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यामधील करोनाचा प्रसार हा गुणाकार पद्धतीने होऊ नयेसाठी काळजी घेतली जात आहे असं सांगताना परदेशातील आकडेवाडीचा संदर्भ दिला. न्यूयॉर्क आणि इराणचे उदाहरण देताना उद्धव ठाकरे यांनी गुणाकार पद्धतीने करोनाचा संसर्ग वाढत जात असं सांगतानाच परदेशातून आलेल्या व्यक्तींना किमान १५ दिवस बाहेर फिरु नये असं आवाहन केलं.
उद्धव ठाकरे यांनी दिलेली माहिती मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्या आठवड्यात करोनाचा संसर्ग झालेले दोन रुग्ण होते. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा १०५ झाला तिसऱ्या आठवड्यात तो ६१३ वर गेला. याच पद्धतीने फ्रान्स, इराण, इटली, स्पेनमध्ये तिसऱ्या चौथ्या आठवड्यात करोनाग्रस्तांच्या आकडा हजारोंच्या घरात गेल्याचे पहायला मिळाले. तुम्हीच पाहा खालील आकडेवारी…