Navratri 2024 दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा

रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (05:00 IST)
शारदीय नवरात्रीचा पूजेचा आज चौथा दिवस आहे. तसेच आज दुर्गादेवीच्या चौथ्या रूपाचे कुष्‍मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीचे मंदिर हे कानपूर मधील घाटमपूर ब्लॉक मध्ये स्थित आहे. कुष्‍मांडा देवीच्या पूजेमध्ये पेठ्याचा नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्व आहे. यासोबतच कुष्‍मांडा देवीला फुल आणि फळे अर्पण करायला हवी.  
 
देवी कुष्मांडाची पूजा विधी-
देवी कुष्मांडाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून देवघर सजवावे. त्यानंतर देवी कुष्मांडाचे ध्यान करून कुंकू, हळद, अक्षत, लाल रंगाची फुले, फळे, विड्याचे पाने, केशर आणि शृंगार आदि श्रद्धा पूर्वक अर्पण करावे. तसेच पांढरा कोहळा किंवा त्याची फुले असतील तर ती मातेला अर्पण करा. नंतर दुर्गा चालिसा पाठ करा आणि शेवटी तुपाचा दिवा किंवा कापूर लावून देवी कुष्मांडाची आरती करावी.
 
नवरात्रीच्या काळात चौथ्या दिवशी दुर्गा देवीच्या चौथे रूप असलेल्या कुष्मांडाची पूजा करण्याची परंपरा सर्वांकडे असते. या दिवशी सर्वजण विधीनुसार देवी दुर्गेची पूजा करतात आणि भोग, मिठाई आणि फळे अर्पण करून आरती करतात. तसेच मालपुआ देवीआईला खूप प्रिय आहे. त्यामुळे पूजेतही मालपुआ ठेऊ शकतात.
 
तसेच या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
 
असे म्हणतात की, या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.
 
कुष्मांड म्हणजे कोहळा आणि कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. या देवीचे रुप पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे असून कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती