देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (12:04 IST)
देवीचा नामजप मूर्तीच्या चरणांपासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो. यासाठी हळदीपासून बनवलेले कुंकू वापरले जाते. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते.
 
कुंकुमार्चन विधी करण्यासाठी कोणत्याही नवरात्रीचे नऊ दिवस, लक्ष्मी पूजनाचा दिवस तसेच महिन्यातील पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, मंगळवार किंवा शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन अवश्य करावे. असे केल्याने मूर्तीतील देवत्व जागृत होते.  
 
कुंकुमार्चन पूजा विधी
 
एका तांब्याच्या/ पितळेच्या किंवा चांदीच्या ताम्हणात देवीची मूर्ती ठेवावी.
त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. 
लाल फुले वाहावी. दीप- धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा.
त्यानंतर देवीच्या मंत्राचा जप करत चिमूटभर कुंकू अर्पण करत जावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रा” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट याने कुंकु घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे.
काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करताना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते.
मंत्रजप किंवा नामजप झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. आपल्या मनाची इच्छा सांगावी.
दुसर्‍या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वी स्थानी स्थापित करावे.
हे कुंकू पुन्हा पूजेत वापरू नये.
कुंकू डबीत भरून रोज आपल्या मस्तकावर लावावे.
कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून आप्तेष्टांना वाटावे.
कुंकुमार्चन 5, 7 किंवा 11 सुवासिनींसोबत केल्याने वातावरणात प्रसन्नता येते. 
 
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्त्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
 
कुंकुमार्चन देवीची 108 नामावली 
ॐ प्रकृत्यै नमः
ॐ विकृत्यै नमः
ॐ विद्यायै नमः
ॐ सर्वभूतहितप्रदायै नमः
ॐ श्रद्धायै नमः
ॐ विभुत्यै नमः 
ॐ सुरभ्यै नमः
ॐ परमात्मिकायै नमः 
ॐ वाचे नमः
ॐ पद्मालययै नमः
ॐ पद्मायै नमः
ॐ शुच्यै नमः
ॐ स्वाहायै नमः
ॐ स्वधायै नमः
ॐ सुधायै नमः
ॐ धन्यायै नमः
ॐ हिरण्मयै नमः
ॐ लक्ष्मीयै नमः
ॐ नित्यपुष्टायै नमः
ॐ विभावर्ये नमः (20)
ॐ आदित्यै नमः
ॐ दित्यै नमः
ॐ दिप्तायै नमः
ॐ वसुधायै नमः 
ॐ वसुधारिण्यै नमः 
ॐ कमलायै नमः
ॐ कांतायै नमः 
ॐ कामाक्ष्यै नमः 
ॐ क्रोधसंभवायै नमः
ॐ अनुग्रहपरायै नमः
ॐ ऋद्धाये नमः
ॐ अनघायै नमः 
ॐ हरीवल्लभायै नमः 
ॐ अशोकायै नमः 
ॐ अमृतायै नमः 
ॐ दीप्तायै नमः 
ॐ लोकशोक विनाशिन्यै नमः 
ॐ धर्मनिलयायै नमः 
ॐ करुणायै नमः 
ॐ लोकमात्रे नमः
ॐ पद्मप्रियायै नमः
ॐ पद्महस्तायै नमः
ॐ पद्माक्ष्यै नमः 
ॐ पद्मसुंदर्यै नमः 
ॐ पद्मोद्भवायै नमः 
ॐ पद्ममुख्यै नमः 
ॐ पद्मनाभाप्रियायै नमः 
ॐ रमायै नमः 
ॐ पद्ममालाधरायै नमः
ॐ देव्यै नमः
ॐ पद्मिन्यै नमः
ॐ पद्मगंथीन्यै नमः
ॐ पुण्यगंधायै नमः
ॐ सुप्रसन्नायै नमः 
ॐ प्रसादाभिमुख्यै नमः
ॐ प्रभायै नमः 
ॐ चंद्रवदनयै नमः
ॐ चंद्रायै नमः 
ॐ चंद्रसहोदर्यै नमः
ॐ चतुर्भुजायै नमः
ॐ चंद्ररूपायै  नमः
ॐ इंदिरायै नमः
ॐ इंदूशीतुलायै नमः 
ॐ आल्होदजनन्यै नमः
ॐ पुष्ट्यै नमः 
ॐ शिवायै  नमः
ॐ शिवकर्यै नमः
ॐ सत्यै नमः 
ॐ विमलायै  नमः
ॐ विश्वजनन्यै नमः
ॐ तूष्ट्यै नमः
ॐ दारिद्र्य नाशिन्यै नमः 
ॐ प्रीतिपुष्करिण्यै नमः
ॐ शांतायै नमः
ॐ शुक्लमाल्यांबरायै नमः
ॐ श्रियै नमः
ॐ भास्कर्यै नमः
ॐ बिल्वनिलयायै नमः
ॐ वरारोहायै नमः
ॐ यशस्विन्यै नमः
ॐ वसुंधरायै नमः
ॐ उदारांगायै नमः 
ॐ हरिण्यै नमः
ॐ हेममालिन्यै नमः
ॐ धनधान्यकर्यै नमः
ॐ सिद्धये नमः
ॐ स्त्रेण सौम्यायै नमः
ॐ शुभप्रदायै नमः
ॐ नृपवेश्म गतानंदायै नमः 
ॐ वरलक्ष्मै नमः
ॐ वसुप्रदायै नमः
ॐ शुभायै नमः
ॐ हिरण्यप्राकारायै नमः 
ॐ समुद्र तनयायै नमः
ॐ जयायै नमः
ॐ मंगलायै नमः
ॐ देव्यै नमः 
ॐ विष्णू वक्ष:स्थल स्थितायै नमः
ॐ विष्णूपत्नेयै नमः 
ॐ प्रसन्नाक्ष्यै नमः
ॐ नारायण समाश्रितायै नमः
ॐ दारिद्र्य ध्वंसिन्यै नमः 
ॐ सर्वोपद्रव वारिण्यै नमः 
ॐ नवदुर्गायै नमः
ॐ महाकाल्यै नमः
ॐ ब्रम्हा विष्णू शिवात्मिकायै नमः
ॐ त्रिकाल ज्ञान संपंन्नायै नमः
ॐ भुवनेश्वर्यै नमः

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती