आज आपण काहीतरी वेगळी रेसिपी जाणून घेऊ या. अनेकांना गोड पदार्थ आवडतात. अनेक वेळेस आपण देवासाठी नैवेद्य गोड म्हणून काहीतरी बाजारातून आणतो. पण आज आपण असाच एक छान गोडाचा पदार्थ पाहू या. जो लहान्यांपासून मोठ्यांना देखील आवडेल. तर चला जाणून घेऊ या दूध पाक रेसिपी.
साहित्य-
अर्धा कप तांदूळ
2 कप दूध
2 चमचे साखर
वेलची पूड
खवा
कृती-
दूधपाक बनवण्यासाठी सर्वात आधी 15 मिनट तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालावे. थोड्या वेळानंतर चाळणीमध्ये तांदूळ घालून पाणी काढून घ्यावे.
आता गॅसवर पातेले ठेऊन त्यामध्ये तूप घालावे व तांदूळ भाजून घ्यावे. आता हे तांदूळ प्लेटमध्ये काढून घ्यावे.
आता त्याच पातेलीत दूध घालून गरम करावे. 10 से 15 मिनट मोठ्या आंच वर उकळू द्यावे.
जेव्हा दूध आटून अर्धे होईल तेव्हा साखर, वेलची पूड, तांदूळ घालून दहा मिनिट शिजू द्यावे.
आता यामध्ये केशर आणि खवा घालून गॅस बंद करावा. एका बाऊलमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे.
तर चला आपला दूध पाक तयार आहे. जो तुम्ही पाहुण्यांसाठी बनवू शकतात. तसेच नैवेद्य देखील दाखवू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.