गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

शुक्रवार, 5 मार्च 2021 (11:32 IST)
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे बडे वतनदार अमृतराव देशपांडे गजानन महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यांना आपल्या समोर एक वेडापिसा दिगंबर दिसला. अमृतराव मनी म्हणाले "काय हे वेडे लोकं, हा तर समोर कोणी भष्ट्र दिसतोय. याचा दर्शनास एवढी गर्दी ? असे बोलून ते नाक मुरडून आपल्या घरी गेले. घरी पोहचल्यावर त्यांचे एवढे पोट दुखू लागले.की ते गडाबडा लोळायलाच लागले. गावातील वैद्य आणले पण कोणालाच गुण येईना. भास्करांना बोलावणे पाठविले गेले. भास्कर येतातच अमृतरावांना म्हणाले-" हा संत निंदेचा परिणाम असे. ह्याला उपाय म्हणजे गजाननास शरण जाऊन त्यांची क्षमा मागणे." अमृतरावांना त्यांची चूक कळाली. ते त्याच अवस्थेत दत्त मंदिरात आले. श्रींच्या चरणी लोळण घेऊन क्षमा-याचना केली. महाराजांच्या कृपेने पोटशूळ त्वरित थांबला. सर्वांनी महाराजांचा जय-जयकार केला.
 
पुढे महाराज भास्करासह बेलुर्यास गणपत पाटीलांच्या घरी आले. भोजनोत्तर ते भास्करासह अकोलीत मिराजी मठास निघाले. तिथे भजन सुरु होते. त्या ठिकाणी पांडुजी अमृत पाटील मृदूंग वाजवीत होते. त्यांना दोन्ही पायांना लकवा मारला होता. बारा वर्षा पासून ते या व्याधीने त्रस्त होते. त्यांची स्वामींवर अपार श्रद्धा होती. ते गुरुभजनात मृदंग वाजवीत होते. इतक्यात स्वामी उठून त्यांचा जवळ येऊन म्हणाले, "ऊठ-ऊठ" व पाठीवर हात मारीत उठवले, आश्चर्य! पांडुजी अमृत पाटील उठले आणि भास्करानी दिलेल्या वाटेवरून चालले सुद्धा. सर्वांनी गुरुमूर्तीचा जयघोष केला.
 
शेगावी समर्थांचा मुक्काम कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात असताना पाटील अत्यंत आनंदात होते. ते महाराजांची सेवा करत होते. घरून जेवण घेऊन मळ्यात येत असत. समर्थांना बसण्यासाठी पलंग आणला होता. भास्करांची स्वारीही सेवेत हजर होती. तेथे गोसावी आपल्या शिष्यासह आला. कृष्णाजी पाटील दयाळू होते. त्यांनी त्यांचा राहण्याची सोय केली तेव्हा ब्रह्मगिरी पाटलास म्हणाले- "पाटील आम्हाला स्वयंपाकासाठी येथे शिधा ताबडतोब पाठवा, म्हणजे आम्ही इथेच भोजन करून तृप्त होऊ." कृष्णाजीने ताबडतोब शिधा सामग्री पाठवली. त्यांना तृप्त केले. 
 
संध्या समयी ब्रह्मगिरी आपल्या शिष्यांसमोर गीतेवर प्रवचन करू लागले. महाराज पलंगावर बसलेले ऐकत होते. त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली, "नैन छिन्दन्ति शास्त्राणि," आणि सांगू लागले कि खऱ्या संतांना शस्त्राने मारल्याने काहीही होत नाही. कारण ते आत्मलीन असतात आणि तुम्ही ज्यांची सेवा करीत आहात ते तर वेडेच वाटतात, काही ज्ञानी दिसत नाही. श्रींची केलेली निंदा भास्करला सहन झालेली नसताना बघून अचानक योगाग्नी प्रकट झाला आणि महाराजांच्या पलंगाच्या पेट घेतला. सर्वत्र ज्वाळा दिसू लागल्या पण महाराज निश्चल बसले होते. ही लीला भास्करने ओळखली. स्वामी ब्रह्णगिरीस उद्देशून म्हणाले, "अरे इथे ये. ह्या पलंगावर येऊन बस आणि गीतेचे तत्वज्ञान जे तू सांगतोस ते खरे करून दाखव." ये बैस बैस.
 
भास्करने ब्रह्मगिरीला उचलून आणले. "तू माझ्या शेजारी पलंगावर बसून दाखव आणि जे ज्ञान दिले ते सिद्ध कर." असे म्हणताच आधीच दाम्भिक त्यात सत्वपरीक्षा, जीवावरच संकट आलेले बघून तो थरथर कापू लागला. त्याने गजाननाच्या चरणी लोटांगण घालून क्षमायाचना केली. महाराज म्हणाले, "भास्कर या पोटभऱ्यास सोडून दे." गोसावी स्वामींच्या चरणी लागले. सगळ्यांनी महाराजांचा जयजयकार केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती