योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले.
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये.
आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सदैव मेळ असावा.
अतिथीस कधीच खाण्या पिण्याचा वाजवीपेक्षा जास्त आग्रह करू नये.
संकट आल्यावर ईश्वराची भक्तीच तारून नेते.
पहिली संपत्ती ही निरोगी शरीर आहे.
पैसा हे सर्वस्व नाही, परमेश्वराची कृपा असणे गरजेचे आहे.
मुक्या जनावरांस त्रास देऊ नये.
संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ह्या कर्मांचे फळ मनुष्यास भोगावे लागते.