श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा जाणून घ्या
गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (07:55 IST)
अध्याय १
निराशा, मन:शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात
अध्याय २
कुटुंबातील व्यथा आणि अडचणी
अध्याय ३
दुसऱ्यांचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावल्या गेले असेल तर, कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर
अध्याय ४
जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी
अध्याय ५
दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल व पाणी जवळ नसेल तर, गेलेली संपत्ती परत येईल, जीवनात सकारात्मक बदल होईल
अध्याय ६
चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट मधील फरक कळेल
अध्याय ७
निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल, इच्छुकांना संतान प्राप्ती होईल
अध्याय ८
कायदे विषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेस मध्ये विजय मिळेल, अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल
अध्याय ९
हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल, शत्रूंचा नाश होईल, चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल, महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात किंवा स्वप्नात दर्शन होईल (जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल)
अध्याय १०
आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्ती/ प्रभाव कमी करण्यासाठी, आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी
अध्याय ११
ध्येय प्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा ह्यासाठी, स्वरक्षण होण्यासाठी, अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी
अध्याय १२
आपल्या धंद्यात, उद्योगात, शेतीत चांगले उत्पादन, धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगल्या कार्यात यश प्राप्तीसाठी
अध्याय १३
कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी, महापूर, वादळ, अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती/ संकटापासून रक्षण होण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी
आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी, काम- क्रोध मत्सर लोभ पासून दूर राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, पगार वाढीसाठी, असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी
अध्याय १६
खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी, अती तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास
अध्याय १७
खोट्या/चुकीच्या आरोपातून मुक्तता, दुसऱ्यांकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती
अध्याय १८
खोट्या आरोपातून मुक्तता, तीर्थ अंगारा घेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील, इष्ट देवतेचे दर्शन होईल
अध्याय १९
विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल, स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल
अध्याय २०
विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योग धंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल
अध्याय २१
मनःशांती, आरोग्य, सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचीती घ्या.