भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारानंतर, नवी दिल्लीने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील विमानतळ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता भारतीय विमाने पुन्हा उड्डाणासाठी सज्ज आहेत.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानसोबत तणाव वाढला असताना, भारताने 15 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत 32 विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्याची घोषणा केली होती, असे भारतीय विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या नोटिस टू एअरमेन (NOTAM) मालिकेत म्हटले आहे. सोमवारी सकाळी ते NOTAMs तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आणि विमानतळांवरून नियमित उड्डाणे लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "प्रवाशांच्या लक्षात आणून देण्यासाठी 15 मे 2025 रोजी सायंकाळी 5:29 वाजेपर्यंत 32 विमानतळे नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याची सूचना जारी करण्यात आली होती. आता हे विमानतळ तात्काळ प्रभावाने नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे. प्रवाशांना विमान कंपन्यांकडून थेट विमानाची स्थिती तपासण्याचा आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइन वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे."
प्रभावित विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, अंबाला, लुधियाना, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, उत्तरलाई, राजकोट, भुज, जामनगर, धर्मशाला, भटिंडा, पटियाला, पठाणकोट, शिमला, किशनगड, हिंडन, पोरबंदर, मुंद्रा आणि कांडला यांचा समावेश आहे.या सर्व विमानतळांवरून आता उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत.
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने एका प्रवासी सल्लागारात म्हटले आहे की, "सरकारच्या नवीनतम निर्देशांनुसार, विमानतळे उड्डाणांसाठी खुली झाली आहेत.
कंपनीने म्हटले आहे की सेवा सामान्य होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, विमान कंपनीने प्रवाशांना काही अतिरिक्त वेळेसह विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.प्रवाशांना विमान कंपन्यांकडून थेट विमानाची स्थिती तपासण्याचा आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइन वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे."