पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानसोबत युद्धविराम करार लागू झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती कशी आहे?युद्धविरामनंतर सध्या पाकिस्तानची भूमिका काय आहे? सैनिकांना कोणते मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत? दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानचे किती नुकसान झाले आहे? अशा सर्व प्रश्नांवर भारतीय लष्करातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी पाकिस्तानात सुरू करण्यात आलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला .
लढाऊ विमाने, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथळा, जालंधर आणि जैसलमेर येथील लष्करी तळांवर आणि शस्त्रास्त्र डेपोवर हल्ला केला. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य केले. चार दिवसांच्या लढाईनंतर, पाकिस्तान मागे पडला आणि त्याने भारताला युद्धबंदीचे आवाहन केले. भारताने स्वतःच्या अटींवर युद्धविराम लागू करण्यास सहमती दर्शविली.