मुंबई : कुर्ला येथे अनियंत्रित बसने अनेक वाहनांना दिली धडक, 6 ठार तर 49 गंभीर जखमी

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (08:51 IST)
Mumbai News: महाराष्ट्रातील मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी एका अनियंत्रित बसने रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांना चिरडले. बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली.  
ALSO READ: पीएम मोदींना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अजमेर मधून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातातील काहींची प्रकृती स्थिर असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकाला अटक केली. तसेच अपघाताबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोच. व जखमींना उपचारासाठी भाभा आणि सायन रुग्णालयात नेण्यात दाखल करण्यात आले. बसबाबत अधिकारींनी सांगितले की, ही बस मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेची आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख