मुंबई मध्ये 20 माजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा एका मजल्यावरी स्लॅप कोसळल्याने मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबई मधील मलाड परिसरात घडलेली आहे. या परिसरात 20 माजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. व या इमारतीमधील एका मजल्यावरील स्लॅप कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झालेत.