मिळालेल्या माहितीनुसार शहरातील हिंगणा परिसरात रविवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वादानंतर 25 वर्षीय भावाने 36वर्षीय मोठ्या भावावर हल्ला केला. दोघे भाऊ एकाच घरात आई आणि कुटुंबासह राहत होते. हिंगणा पोलीस ठाण्यातील एका अधिकारींनीं सांगितले की, “कौटुंबिक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्याने भावांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाच्या छातीवर व डोक्यावर अनेक वार करून त्याला गंभीर जखमी केले. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती, परंतु बुधवारी पोस्टमार्टम अहवालात किसनचा मृत्यू जखमांमुळे झाल्याचे उघड झाले, असे अधिकारींनी सांगितले. पोलिसांनी लहान भावाची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.