उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका मंदिरात पूजा करत असताना एका २१ वर्षीय विद्यार्थिनीवर एका तरुणाने गोळीबार केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नंतर पोलिसांच्या चकमकीनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली. कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी फतेह बहादूर सिंह यांनी सांगितले की, किला की बाजारिया येथील राणी का शिव मंदिरात सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली.
दिव्यंशी राठोड (२१) पूजा करत असताना त्याच परिसरातील राहुल दिवाकर (२४) याने तिच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे दिव्यंशी गंभीर जखमी झाली. तिच्या पोटात आणि इतर ठिकाणी गोळ्या लागल्या आहे. हल्ल्यानंतर राहुल तेथून पळून गेला. त्यांनी सांगितले की दिव्यंशीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे.