मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एका मुलीचा वेदनादायक मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी छोले बनवण्यासाठी भांड्यात गरम पाणी टाकले होते. दीड वर्षांची मुलगी खेळायला गेली आणि गरम पाण्याच्या भांड्यात पडली. उकळत्या पाण्यात पडल्याने मुलगी गंभीर भाजली. मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला.