केस गळतीवर आयुर्वेदातील प्रभावी उपचार नक्की करून बघा...

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (17:17 IST)
बर्‍याच हर्बल वस्तू आहेत ज्यांच्या प्रयोगामुळे केसांचे गळणे आपण कमी करू शकतो. जाणून घ्या, आयुर्वेदाच्या आधारावर पाच सोपे उपाय जे केसांची गळती कमी करू शकतात.

भृंगराज
मजबूत आणि दाट केसांसाठी आयुर्वेदात भृंगराजचे फार महत्व आहे. भृंगराज तेलामुळे फक्त टक्कलच पडणे कमी होते बलकी वेळेआधी केसांना पांढरे होण्यापासून ही बचाव होतो.

ब्राह्मी
ब्राह्मी आणि दहीचे पॅक तयार करून केसांवर लावल्याने केसांचे गळणे कमी होईल. ब्राह्मीच्या तेलाने न‌ियम‌ित मसाज केल्यामुळे देखील केस दाट होतात.
आवळा 
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रेत आहे जे केसांची वाढ करण्यास मदत करतात. आवळ्यात हिना, ब्राह्मी पाउडर व दही मिसळून पॅक तयार करून केसांवर लावावे.

कडूलिंब 
कडू लिंबाच्या प्रयोगाने केस फक्त दाटच होत नाही तर त्यामुळे कोंडा व ऊवांची समस्या देखील दूर होते. कडूलिंबाच्या पानांचे पावडर तयार करून घ्या. त्यात दही किंवा नारळाचे तेल मिसळून मसाज करायला पाहिजे.

रीठा
रीठ्याच्या प्रयोगाने केसं काळे आणि दाट होतात. रीठा पावडरमध्ये तेल मिसळून डोक्याची मसाज केल्याने केसांची गळती थांबते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती