उन्हाळ्यात फायदेशीर बेलफळ ह्याचे 7 गुणधर्म जाणून घ्या

गुरूवार, 19 मे 2022 (07:33 IST)
बेलपत्र आणि बेलफळ हे सामान्यतः शंकराची पूजा करण्यासाठी वापरले जाते.परंतु आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील बेलफळ फायदेशीर आणि महत्वाचे आहे. विशेषतः उन्हाळ्यात हे थंडावा देण्यासह आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. याचे 7 गुणधर्म जाणून घेऊ या. 
 
1  उन्हाळ्यात उष्णमाघाताची भीती सर्वाधिक असते. बेलाचे सरबत पिण्याने उष्माघाताचा धोका होत नाही  आणि उष्माघात झाल्यास ते औषध म्हणून कार्य करते. शरीराची उष्णता दूर करण्यासाठी  हे खूप फायदेशीर आहे.
 
2 शरीरात उष्णता वाढल्यावर अ‍ॅमीबिक डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यातून मुक्त होण्यासाठी दररोज अर्धा कच्चा-पक्का  बेलफळांचे सेवन करा किंवा बेलाचे शरबत प्या . अतिसारामध्ये हे खूप फायदेशीर आहे.
 
3 उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोळे लाल होऊन त्यात जळजळ होते. अशा 
परिस्थितीत,  बेलाच्या पानांचा रस एक थेंब डोळ्यात टाकल्यास लगेचच फायदा होतो आणि कोणतीही हानी होत नाही. बेलाच्या पानाच्या रसात कचरा नसल्याचे सुनिश्चित करा. बेलाच्या पानांचा लगदा डोळ्यावर बांधल्याने डोळ्याच्या दुखण्यात आराम मिळतो. 
 
4 पचन संबंधी त्रासांमध्ये पिकलेल्या बेलफळाचे सेवन करणे फायदेशीर आहे. याचे सरबत प्यायल्याने पोट साफ होते.हे पाचक असण्यासह बलवर्धक आहे. वात-कफ संबंधित समस्या देखील याचा  वापर केल्यामुळे दूर होतात. जर गरोदर स्त्रियांना उन्हाळ्यात मळमळ होत असेल  तर दोन चमचे बेल आणि सुंठाचा काढा प्यायला दिल्याने फायदा होतो.  
 
5 बेलाचा मोरावळा शरीराचे सामर्थ्य वाढवते. अशक्तपणा दूर करतो.  
पोटाच्या समस्येमध्ये हे फायदेशीर आहे, बेलाचा लगदा खांडासह  खाल्ल्याने आतड्यांसंबंधी रोगात आराम मिळतो.
 
6 मुलांच्या पोटात जंत झाले असल्यास, बेलाच्या  पानांचा अर्क पाजणे हा एक प्रभावी उपाय आहे. एक चमचा पिकलेले बेल लहान मुलांना दररोज दिल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.
 
7 बेलाच्या फळाला मध आणि खडीसाखरेसह चाटल्याने शरीराच्या रक्ताचा रंग स्वच्छ होतो. रक्तात देखील वाढ होते.याच्या गर मध्ये काळी मिरी,सेंधव मीठ मिसळून खाल्ल्याने आवाज सुमधुर होतो.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती