येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण निर्णय त्यांच्या बाजूने गेला नाही. तिसऱ्या षटकात कर्णधार आणि सलामीवीर चमारी अटापट्टू (06) धावबाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या संघात विकेट्सचा भडका उडाला. रेणुका सिंगने (5/3) पुढच्याच षटकात हर्षिता मडावी आणि हसिनी परेरा यांना बाद केले तर अनुष्का संजीवनी धावबाद झाली. यानंतर रेणुकाने सहाव्या षटकात कविशा दिलहरीला 16 धावांत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
43 धावांवर श्रीलंकेच्या नऊ विकेट पडल्यानंतर शेवटच्या दोन फलंदाजांनी 27 चेंडूत 22 धावांची चतुराई भागीदारी करत संघाला 20 षटकांत 65/9 पर्यंत नेले. इनोका रणवीराने 22 चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या, तर 11व्या क्रमांकाचा फलंदाज अचीनी कुलसूर्याने 13 चेंडूंत सहा धावा जोडल्या.
Edited by : Smita Joshi