IPL 2025 मेगा लिलाव जेद्दाहमध्ये सुरू आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने मोठा निर्णय घेतला आणि स्टार अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांमध्ये परत आणले. तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. 29 वर्षीय खेळाडूची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. व्यंकटेशला मिळवण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये स्पर्धा होती.
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) सहा खेळाडूंना कायम ठेवले. यामध्ये रिंकू सिंग (13 कोटी), वरुण चक्रवर्ती (12 कोटी), सुनील नरेन (12 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), हर्षित राणा (04 कोटी) आणि रमनदीप सिंग (04 कोटी) यांचा समावेश होता. आता संघाने व्यंकटेश अय्यरला विकत घेतले आहे. फ्रँचायझीने त्याच्यावर मोठी रक्कम खर्च केली आहे.