आयपीएल 2024 साठी गेल्या वर्षी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार्क यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला आणि या दोघांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढले. कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर सुमारे दोन तासांनंतर ऑस्ट्रेलियाचा तुफान गोलंदाज मिचेल स्टार्क लिलावात आला आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. दोघांची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि तोही एकाच वेळी दोन खेळाडूंवर.
श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल, अर्शदीप सिंग, जोस बटलर आणि मिचेल स्टार्क यांसारख्या दिग्गज खेळाडूंवरही बोली लावण्यात आली .अपेक्षेप्रमाणे पंतने स्टार्कचा विक्रम मोडला आणि तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची विक्रमी किमतीत विक्री झाली.
पहिला श्रेयस पंजाब किंग्जने 26.75कोटी रुपयांना विकत घेतला. तोपर्यंत श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, काही काळानंतर ऋषभ पंत लिलावात उतरला आणि त्याला लखनौ सुपरजायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. अशा प्रकारे पंत हा आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू ठरला. पंत आणि श्रेयसने या प्रकरणात मिचेल स्टार्कला मागे टाकले.